*मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांचा कौतुकास्पद उपक्रम....*
*वाढदिवसाचा वायफळ खर्च टाळून अर्धांगवायू आजाराने ग्रासलेल्या पक्षाच्या सहकारी पदाधिकाऱ्याला केली आर्थिक आणि जीवनावश्यक वस्तूंची मदत.....*
उल्हासनगर शहाड परिसरात राहणारे बाळू पवार हे मनसे पक्षाचे जुने आणि निष्ठावान कार्यकर्ते आहेत,परंतु रिक्षा चालवून स्वतःचा उदरनिर्वाह चालवणारे बाळू पवार यांना काही दिवसांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आलेला होता,आणि अगोदरच हालाखीची परिस्थिती असल्याने आणि त्यावर अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांची घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची बनलेली असल्याची माहिती मनसेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांना स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतर आपल्या १४ जुलै रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त होणारा वायफळ खर्च टाळून या आपल्या पक्षाच्या सहकाऱ्याला मदत करायचा निर्णय मैनुद्दीन शेख यांनी घेतला आणि जीवनावश्यक वस्तू तसेच काही आर्थिक मदत ही बाळू पवार यांना यावेळी करण्यात आली तसेच बाळू पवार यांच्या तीन चाकी रिक्षावर कर्ज आहे आणि ते कर्ज कश्या प्रकारे माफ करता येईल याचा पाठपुरावा ही मनसे तर्फे करण्यात येणार असल्याचे जिल्हा सचिव संजय घुगे यांनी सांगितले.
यावेळी विठ्ठल मोरे,विक्रम दुधसाखरे,बादशहा शेख, मनीष मोरे,अमित सिंग आणि स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पणियाँ