रेशनिंगच्या दूकानातील धान्याची काळया बाजारात विक्री करणा-या महीलेच्या विरोधात गुन्हा दाखल. .
उल्हासनगर / प्ररिनिधी अपटा : उल्हासनगर येथे रेशनिंगच्या दूकानातील धान्याची चोरी करुन नागरीकांची व शासनाची फसवणुक करणा-या महिलेच्या विरोधात उल्हासनगर येथील विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उल्हासनगर येथे वास्तव्यास असलेल्या ज्योती रामनिवास ढकोलिया ही महीला आपल्या रेशनिंग दूकानातील धान्य शिधावाटप नागरीकांना देत नसल्याच्या तक्रारी नागरीकांनी केल्या होत्या. हया तक्रारीची दखल घेत काल दूपारच्या सुमारास शिधावाटप अधिकारी शशिकांत बाळकृष्ण पाटसुते (५० )यांनी त्यांच्या पथकासह धाड टाकली असता हा प्रकार उघडकीस आला.ज्योती रामनिवास ढकोलिया या महीलेने शासनाच्या वतीने गोर गरीब गरजु नागरीकांना देण्यात येणारे धान्य काळ्या बाजारात विकल्याचे दिसुन आले.तसेच वहीत नागरिकांना धान्य विक्री केल्याची खोटी नोंदही करण्यात आली असल्याचे निर्दशनास आले आहे महीलेने आज पर्यंत दुकानातील किती धान्य कोणाला विक्री केले.याचा तपास पोलीस करत आहेत.याबाबत ज्योती रामनिवास ढकोलिया या महीलेच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुंन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्न्हैया थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत.
0 टिप्पणियाँ